कारण City Heart चा जिंकणं हा उद्देश्य कधीच नव्हता अथवा त्याविषयीचा लोभही कधी नव्हता.
मात्र पराभुत नजरांमध्ये आत्मविश्वासाची ज्वाला पेटवने. यासाठी मात्र आम्ही अविरतपणे धडाडीने प्रत्येक क्षणाक्षणाला खपत असतो....!!!
मुलांच्या अभ्यासाबरोबर त्यांना माणुस म्हणुन घडवण्याचे जे व्रत आम्ही हाती घेतले आहे ते अविरत पणे मशालीप्रमाने तेवत राहील यात शंका नाही. नोकरी साठी शिक्षण हा संकुचित हेतु न ठेवता हज़ारों हातांना काम देणारी पीढी आम्हाला घडवायची आहे . आम्ही त्यामध्ये नक्की यशस्वी होऊ .
११ वी १२ वी ही एक संधी आहे, मुलांच शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची नियोजन क्षमता तपासण्याच, पण अशा वेळी बहुतांशी मुलं आत्मविश्वासा अभावी ढासळलेली दिसतात, आमचा पहिला उद्देश हा मुलांना परीक्षांसाठी, स्वतः ला आजमावण्यासाठी तयार करण आहे. म्हणून तर आजपर्यंत सिटी हार्टच्या शेकडो विद्यार्थ्यांची सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि मेडिकल कॅालेजेस साठी निवड झाली आहे.
मी स्वतः एका गरीब कुटुंबामधुन आलोय, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांच्या आई -वडिलांनी कमवलेल्या एक ना एक रुपयांची किंमत जाणतो. त्यामुळे आम्ही ५ तास शिकवण्याबरोबर ३ तास अभ्यास करुन घेण्याचा पॅटर्न विकसित केला आहे . म्हणूनच क्लासमध्ये शिकवलेली प्रत्त्येक गोष्ट समजण्याची व यश मिळवून देण्याची हमी आम्ही देतो.
चला तर मग...! एक नवी सुरुवात करूयात…!!